नमस्कार ग्राहकांनो, सरस्वती लाडू डेपो हा उद्योग १९७८ साली सुरु झाला. उद्योगाची सुरुवात घरगुती पद्धतीने झाली. श्री आप्पा कुडतरकर हे ह्या उद्योगाचे मालक आहेत. काही वर्षानंतर गृह उद्योगाचे रूपांतर छोट्या दुकानात झाले. हे दुकान मुंबईतील माहीम (प) लेफ्ट. दिलीप गुप्ते मार्गावर रिझर्व्ह बँक स्टाफ कॉलोनी समोर आहे. पुढे दुकान व मागे कारखाना असल्यामुळे कारखान्यात तयार झालेला पदार्थ दुकानात ताजा - ताजा विक्री होतो. अनेक उत्कृष्ठ प्रकारचे लाडूंची रेसिपी तयार करून ती दुकानात कमीत कमी दरात विकता यावी या हेतूने हा व्यवसाय जोमाने उभा केला. ह्या व्यवसायात त्यांची पत्नी सौ आनंदी आप्पा कुडतरकर यांचे खूप मोठे योगदान आहे. हळू हळू मिठाई व फराळ ह्या गोष्टींचा सुद्धा समावेश करण्यात आला त्यात त्यांचा एकच हेतू होता कि सर्व आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट पदार्थ कमीत कमी दरात उपलब्ध व्हावेत.आता पर्यंत आमच्याकडे १०० हुन अधिक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. जसे लाडू , मिठाई व फराळ ई. आमच्याकडे लाडू दर दिवशी व मिठाई एक दिवस आड बनवले जाते तसेच फराळ आठवड्यातून दोनदा बनत असते.ग्राहकांच्या भरभरून प्रेम आणि आशीर्वादामुळे व्यवसाय इथपर्यंत पोहोचला. आपल्या शुभचिंतक ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे व त्यांचे श्रम कमी करण्याहेतू आम्ही ऑनलाईन स्टोर चालू केले आहे. www.saraswatiladudepot.com ह्या वेब साईटवर तुम्ही घर बसल्या सगळ्या सोयीचा आनंद घेऊ शकता.

Login

forgot password?